नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्डमध्ये छापलेल्या निवडणुकीच्या आधीच्या सर्वे रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे. हा सर्वे लीक झाला आहे. काँग्रेसने गुजरातमधील एका खासगी एजंसीकडून हा सर्वे केला होता. काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्डच्या वेबसाईटवर हा सर्वे रिपोर्ट प्रकाशित झाला आहे. स्पीक मीडिया नेटवर्कने हा सर्वे केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पीक मीडिया नेटवर्कच्या या सर्वेनुसार काँग्रेस-बीएसपी यांची युती झाली किंवा नाही झाली तरी मध्यप्रदेशमध्ये सरकार भाजपचंच येईल. सर्वेमध्ये एजंसीने युतीशिवाय काँग्रेसला 73 जागा तर युती केली तर 103 जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे. पण भाजपला मात्र 126 ते 147 जागा मिळण्याची शक्यता आहे.


कांग्रेसने गुजरातसह कर्नाटक आणि दिल्लीच्या खासगी एजंसीसह एकूण 4 खासगी एजंसींना या सर्वेची जबाबदारी दिली होती. कर्नाटकच्या निवडणुकीत एजंसीने सर्वेमध्ये म्हटलं होतं की, काँग्रेसला 84 जागा मिळतील. इतर सर्वे रिपोर्ट येणं अजून बाकी आहे. काँग्रेसचे सर्वे लीक झाल्याने यावर बोलतांना मीडिया प्रभारी शोभा ओझा यांनी म्हटलं की, 'कोणताही सर्वे लीक झालेला नाही. कोणताही सर्वे हा अतिंम निर्णय नसतो.'