गुजरात: काठावर पास भाजपला कॉंग्रेसचे ट्विटरवरून चिमटे
150 जागांचे ध्येय असलेल्या भाजपला केवळ 99 जागांवर समाधान मानावे लागले.
मुंबई : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा अखेर निकाल लागला. निकाल भाजपच्या बाजूने लागला. पण, अपेक्षीत यश मिळवायला भाजपला मोठे अपयश आले. 150 जागांचे ध्येय असलेल्या भाजपला केवळ 99 जागांवर समाधान मानावे लागले. अशा स्थितीत कॉंग्रेसने मात्र जोरदार मुसांडी मारत 80 जागा जिंकल्या आणि गुजरातमधला प्रबळ विरोधी पक्ष ठरला. दरम्यान, आपल्या विजयाला अभूतपूर्व विजय म्हणत भाजपने जल्लोष सुरू केला असला तरी, कॉंग्रेसने मात्र ट्विटरच्या माध्यमातून भाजपला चांगलेतच चिमटे काढले आहेत.
भाजपच्या विजयातही पराभव
कॉंग्रेस प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पराभवानंतर आपल्या ट्विटर अकाऊंटवरून भाजपला एकापाठोपाठ 10 ट्विट केली आहेत. सुरजेवाला यांच्या ट्विटचा आधार घेता गुजरातमध्ये कॉंग्रेस अधिक मजबूत झाली आहे. सुरजेवाला म्हणतात की, गुजरातची जनता कॉंग्रेसला स्विकारत आहे. तर, भाजपचा जनाधार मोठ्या प्रमाणात गटत आहे. आपले म्हणने अधिक जोरकसपणे मांडताना सुरेजवाला म्हणतात, भाजपच्या विजयातही पराभव आहे. कॉंग्रेसने आघाडी हारली पण युद्ध नाही हारले.
भाजपला केवळ 99 जागांवर आडवले
सुरजेवाला यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील मतदारांचे आभार. लोकशाही मजबूत करण्यासाठी आपण मोठा हातभार लावला आहे. कॉंग्रेसने आघाडी हारली युद्ध नाही. राहुलने 6.5 कोटी गुजरातींचे मन जिंकले आहे. कॉंग्रेस आणि राहुलने मोदी आणि भाजपला केवळ 99 जागांवर आडवले.
सुरेजवाला यांची ट्विट्स
आपल्या शेवटच्या ट्विटमध्ये सुरजेवाला यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला आम्ही इतकेच सांगू इच्छितो की, 'मत देखिए 'कांग्रेस मुक्त भारत' का सपना, घर-घर में हो खुशी व विकास युक्त भारत हो अपना'.