काँग्रेसचं ट्विटर ब्लॉक, बलात्कार पीडितेच्या कुटुंबाचा फोटो उघड करणं पडलं महागात
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली.
मुंबई : ट्विटरनं काँग्रेस पक्षाचं अधिकृत अकाऊंट ब्लॉक केलं आहे. बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची ओळख उघड करणारा फोटो ट्विटरवर अपलोड केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आलीये.
काँग्रेससह राहुल गांधी आणि पाच नेत्यांचं ट्वीटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी ट्विटरनं राहुल गांधींचंही ट्विटर अकाऊंट ब्लॉक केलं होतं. त्यानंतर राहुल गांधी, रणदीप सुरजेवाल, अजय माकन, सुस्मिता देब यांची अकाऊंट ट्विटरनं ब्ल़ॉक केली आहेत.
काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी दिल्लीतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराप्रकरणी तिच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबियांसोबतचे फोटो ट्विटरवर टाकले. सर्वोच्च न्यायालायाच्या आदेशानुसार बलात्कार पीडित मुलीची ओळख उघड करणारी कोणतीही कृती बेकायदेशीर असल्यानं ट्विटरनं त्यांच्या नियमानुसार अकाऊंट ब्लॉक केले.
त्यानंतर त्यांच्या साथीदारांचीही अकाऊंट ब्ल़ॉक करण्यात आली आहेत. आज सकाळी काँग्रेस पक्षाचं अधिकृत अकाऊंट देखील ब्लॉक करण्यात आलं आहे.