कर्नाटक निकाल : काँग्रेसने भाजपला टाकलं मागे
कर्नाटकमध्ये काँग्रेसचा भाजपला धक्का
बंगळुरु : कर्नाटकमध्ये 31 ऑगस्टला झालेल्या स्थानिक निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली आहे. 120 जागांसाठी ही निवडणूक झाली होती. या निवडणुकांचे निकाल सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी घोषित केला जाऊ शकतो.
आतापर्यंत एकूण 2709 जागांपैकी 2454 जागांचा निकाल घोषित झाला आहे. ज्यामध्ये भाजपला मोठा धक्का लागू शकतो. काँग्रेसने आतापर्यंत 913 जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने आतापर्यंत 855 जागांवर विजय मिळवला आहे.
31 ऑगस्ट रोजी झालेल्या या निवडणुकीत एकूण 8,340 उमेदवारांनी निवडणूक लढवली. काँग्रेसचे 2,306 तर भाजपचे 2,203 आणि जेडीएसचे 1,397 उमेदवार मैदानात होते. याशिवाय 814 उमेदवार महापालिका निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. ज्यामध्य़े काँग्रेसचे 135, भाजपचे 130 आणि जेडीएसचे 129 उमेदवार आहेत. जेडीएसने आतापर्यंत 330 जागा जिंकल्या आहेत. 277 ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत.