काँग्रेसचा भाजपला दे धक्का, या पालिकेत काँग्रेसची पुन्हा सत्ता
काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी भाजपला काही ठिकाणी काँग्रेस दे धक्का देत आहेत. याचाच प्रत्यय दीव नगरपालिकेत दिसून आलाय. पुन्हा काँग्रेसने सत्ता मिळवलेय.
सूरत : काँग्रेस मुक्त भारत अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली असली तरी भाजपला काही ठिकाणी काँग्रेस दे धक्का देत आहेत. याचाच प्रत्यय दीव नगरपालिकेत दिसून आलाय. पुन्हा काँग्रेसने सत्ता मिळवलेय.
काँग्रेसने दीव नगरपालिका निवडणुकीत भाजपला जबरदस्त हादरा दिला आहे. एकूण १३ जागांसाठी निवडणूक झाली. यापैकी १० जागा जिंकत काँग्रेसने विजय मिळवला. याच वर्षी गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका असून दीवमधला पराभव भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.
गेल्या १० वर्षांपासून इथे काँग्रेसची सत्ता असून ती अबाधित राखण्यात काँग्रेसला यश मिळालं आहे. किरट वाजा यांच्या नेतृत्वात भाजपने याठिकाणी निवडणुका लढल्या होत्या. मात्र त्यांचा देखील निवडणुकीत दारूण पराभव झाला. या पराभवामुळे पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा त्यांनी राजीनामा दिलाय.
दरम्यान, या पराभवाचा विधानसभा निवडणुकीवर काहीही परीणाम होणार नाही, असा दावा भाजपचे नेते करत आहे.