जयपुर : आपण असे अनेक किस्से ऐकले किंवा पाहिले आहे की, काही मोठ्या पदावरील लोकं आपल्या पावर आणि पैशांचा वापर करुन मोठ-मोठ्या गुन्ह्यांमधून देखील बाहेर पडतात. सध्या यासंदर्भातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला आमदार तिच्या नातेवाईकाला सोडण्यासाठी पोलिसांना धमकी देत आहे. तसेच नातेवाईकाची चुक असताना देखील, असे सगळेच करतात असं म्हणत त्याच्यावरील आरोप फेटाळत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राजस्थानच्या जोधपूरमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल एका महिला आमदाराच्या नातेवाईकाचे चालान कापण्यात आले. जेव्हा ही बाब आमदारापर्यंत पोहचली तेव्हा तिने पोलिसांना फोन करून त्याला सोडण्यासाठी सांगितले. जेव्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचे म्हणणे ऐकले नाही तेव्हा, तेव्हा तिने तिच्या पतीसह थेट पोलीस स्टेशन गाठले आणि म्हणाली, "प्रत्येकाची मुलं पितात, जर त्याने थोडे प्याले तर काय झालं?" या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे, त्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.


ही महिला काँग्रेस आमदार 


रीपोर्टनुसार हे प्रकरण जोधपूरच्या रतनदादा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. शेरगढमधील काँग्रेसच्या आमदार मीना कंवर यांचा नातेवाईकांना रात्री उशिरा दारूच्या नशेत वाहन चालवताना पोलिसांनी त्याला पकलं. त्यानंतर या नातेवाईकांनी मीना कंवर यांना फोन लावला. मीना कंवर यांनी पोलिसांना त्याला सोडायला सांगितले परंतु पोलिसांनी यासाठी नकार दिला.


पोलिसांनी नकार दिल्यावर आमदार मीना कंवर आपल्या पतीसह थेट पोलीस ठाण्यात गेल्या आणि स्वतःची ओळख करून दिली. तरीही पोलिसांनी नातेवाईकाला काही सोडले नाही, म्हणून ती जमिनीवर बसली.



या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ पोलिसांनी शूट केला. जो सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. असे सांगितले जात आहे की, या व्हिडिओसंदर्भात देखील मीना कंवर यांनी पोलिसांना धमकी दिली.


हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. नियम जनतेच्या सुरक्षेसाठी केलेले असतात, असे असताना स्वत:ला जनतेचे सेवेकरी म्हणणारे लोकं जर अशा प्रकारे कृत्य करु लागले तर जनतेच्या सुरक्षेचं काय? हाच प्रश्न लोकं उपस्थीत करु लागले आहेत.