जयपूर: पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवरून देशातील जनता त्रस्त असताना राजस्थानमधील एका भाजप नेत्याने नागरिकांना अजब सल्ला दिला आहे. इंधनाचे दर वाढल्यावर लोकांनी स्वत:च्या गरजाच कमी कराव्यात, असे राजकुमार रिनवा यांनी म्हटले आहे. रिनवा हे राजस्थान सरकारमधील मंत्री आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंधनाचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या खनिज तेलाच्या किंमतीमधील चढउतारावर अवलंबून असतात. सरकार हे दर नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करत आहे. मात्र, देशात अनेक ठिकाणी पूर आले होते, इतर अनेक खर्चही सरकारला करावे लागतात. कच्च्या तेलाचे दर वाढले की स्वत:चा खर्च कमी केला पाहिजे, हे जनतेला समजत नसल्याचे रिनवा यांनी म्हटले. त्यांच्या या विधानावरून विरोधकांनी टीका करायला सुरुवात केली आहे. 


तत्पूर्वी केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनीही इंधनाच्या दरांबाबत सरकार काहीही करून शकत नसल्याचे सांगितले. या सगळ्यामागे आंतरराष्ट्रीय कारणे आहेत असे सांगितले. तसेच ही बाब देशाच्या जनतेला ठाऊक आहे म्हणूनच त्यांनी विरोधकांच्या बंदला प्रतिसाद दिलेला नाही असेही रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.