MP Election 2023 : मध्य प्रदेशात (MP News) सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे जोरदार वाहताना दिसत आहे. मध्य प्रदेशात होणारी निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे प्रचाराला वेग वाढला आहे. अशातच मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री (Narottam Mishra) यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकारण तापलं आहे. भाजपा खासदार हेमा मालिनी (Hema Malini) यांचा उल्लेख करत उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. सातत्याने वादात सापडणाऱ्या नरोत्तम मिश्रा यांनी केलेल्या विधानामुळे ते पुन्हा अडचण येण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उपमुख्यमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या व्हायरल व्हिडिओमध्ये ते हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. नरोत्तम मिश्रा हे  त्यांच्या विधानसभा मतदारसंघ दतियामध्ये केलेल्या विकासकामांची चर्चा करत होते. त्याचवेळी नरोत्तम मिश्रा यांनी हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. दतिया विधानसभा मतदारसंघात नरोत्तम मिश्रा यांची चांगली पकड आहे. इथून ते चौथ्यांदा विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.


काय म्हणाले नरोत्तम मिश्रा?


हिंदीत बोलताना मिश्रा यांनी जनतेसमोर हेमा मालिनी यांचा उल्लेख केला आणि म्हटलं की, "दतियामध्ये अशा पातळीवर विकास घडवून आणला की, केवळ सांस्कृतिक कार्यक्रमच आयोजित केले जात नाहीत, तर हेमा मालिनी यांनाही डान्स करायला लावला होता."



कॉंग्रेसची टीका


नरोत्तम मिश्रा यांचे हे वादग्रस्त विधान सध्या जोरदार व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये ते हेमा मालिनी यांच्यावर टिप्पणी करताना दिसत आहेत. आता त्यांच्या वक्तव्यावर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी हल्लाबोल केला आहे. 'महिलांबाबत संस्कारी भाजपाच्या माननीय मंत्र्याचा खरा अर्थ ऐका. आपल्याच पक्षाच्या नेत्यालाही ते सोडत नाहीत, असे दिग्विजय सिंह म्हणालेत.  यासोबतच त्यांनी नरोत्तम मिश्रा यांचा हा व्हिडिओही पोस्ट केला आहे.