Cooking tips : बऱ्याचदा घरी बनवलेला भात जास्त होऊन जातो किंवा कोणी खाल्ला नाही म्हणून उरून जातो अश्यावेळी काय करायचं एकतर तो फेकून दिला जातो किंवा दुसऱ्या दिवशी परतून डब्ब्यात दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का, उरलेल्या भातापासून  (cooking tips)अनेक चविष्ट पदार्थ बनवले जाऊ शकतात, आणि तेही अवघ्या काही मिनिटांत. (Leftover Rice Recipe)
चला तर मग आज जाणून घेऊया, उरलेल्या भातापासून कुरकुरीत खमंग मेंदू वडे कसे बनवायचे?  (cooking tips for making medu wada out of leftover rice at home within five minutes recipe in marathi )


साहित्य 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शिजवलेला भात, उरलेला भात  

  • पाव वाटी दही 

  • पाव वाटी रवा 

  • किसलेलं आलं

  • पाव वाटी बारीक चिरलेला कांदा

  • कढीपत्ता 

  • कोथिंबीर 

  • चवीनुसार मीठ 

  • फ्रुट सॉल्ट/ इनो 

  • तांदळाचं पीठ 

  • तळण्यासाठी तेल 


कृती


  • अवघ्या काही मिनिटांत मेंदू वडा (medu wada recipe) बनवण्यासाठी सर्वात आधी शिजवलेला भात, दही मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चांगली पेस्ट बनवल्यानंतर ते मिश्रण एका खोलगट भांड्यात काढून घ्या.

  • आता यामध्ये रवा , हिरवी मिरची बारीक कापलेली, कापलेला कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, (cooking tips) तांदळाचं पीठ इनो, मिरपूड, आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्या.   (cooking tips for making medu wada out of leftover rice at home within five minutes recipe in marathi )

  • हाताला पाणी आणि तेल लावून घ्या. आणि वाडयांना आकार द्या. लक्षात असुद्या हे मिश्रण हे घट्टसर असुद्या 

  • वड्यांना आकार देताना हे मिश्रण हातावर सपाट करून (cooking tips) घ्या. त्यामध्ये एक छिद्र करा आणि ते तेलात हळुवार सोडून द्या. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Tarla Dalal Recipes (@tarladalal


 


)


  • (video credit : taraladalal instagram)

  • हे वडे तळण्यासाठी तेल चांगलं गरम होऊद्या आणि मगच वडे टाळायला घ्या. माध्यम आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत चांगले तळून घ्या

  • तळल्यानंतर टिश्यू पेपरवर काढून घ्या आणि खोबरीच्या चटणीसोबत किंवा सांबर सोबत गरमागरम वड्यांची मजा घ्या. (cooking tips for making medu wada out of leftover rice at home within five minutes recipe in marathi )