Smart Kitchen Tips: जेवण बनवणं हि एक कला आहे (Cooking is an art) . सर्वानाच स्वादिष्ठ पक्वान्न बनवणं शक्य होत नाही. जेवण बनवताना छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप महत्वाचं असत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बऱ्याचदा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्यामुळे जेवण आणखी स्वादिष्ट होऊ शकतं किंवा काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करता येतात. म्हणून काही कुकिंग टिप्स (cooking tips) आपल्या जेवणात मदत करतात.


चला तर मग जाणून घेऊया अशाच काही स्मार्ट कुकिंग टिप्स. 


पराठा बनवा आणखी स्वादिष्ट (paratha tips)


पराठा कोणताही बनवा मात्र जे सारण त्यात घालणार आहेत त्या स्टफिंग मध्ये एक उकडलेला बटाटा घाला. यामुळे पराठा आणखी टेस्टी होईल. 


रायता/ कोशिंबीर  (raita)
रायता बनवणार असाल तर त्यात बुंदी नक्की घाला याने रायत्याचा स्वाद आणखी वाढतो . एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा रायता पातळ असू नये. आणखी स्वादिष्ट बनवण्यासाठी त्यात सेंद्रिय मीठ किंवा काळीमिरी पावडर ऍड करू शकता. 


स्वादिष्ट दुधी हलवा (dudhi halwa recipe)


जर तुम्ही दुधी हलवा बनवणार आहेत तर दुधीचा किस परतत असताना त्यात एक चमचा बेसन घाला  याने हलवा आणखी स्वादिष्ट होतो. पण एक लक्षात ठेवा दोन्ही गोष्टी व्यवस्थित परतणं खूप महत्वाचं आहे . 


हिरव्या मिरच्या खूप काळ ताज्या ठेवणे (how to keep vegetables fresh for long time)


यासाठी मिरच्यांचे देठ खुडून त्या बंद डब्यक्त ठेऊन त्या फ्रीझ मध्ये ठेवाव्या यामुळे हिरव्या मिरच्या जास्त काळ फ्रेश राहतात 


ऑईल फ्री पुरी (oil free puri)


घरी बनवलेल्या पुऱ्या जर जास्त तेल सोकत असतील तर पुऱ्या लाटून त्या काही वेळासाठी फ्रिजमध्ये ठेऊन द्या. या नंतर जेव्हा तुम्ही पुऱ्या तळायला घ्याल तेव्हा नक्कीच कमी तेल लागेल. पुऱ्या खायलासुद्धा कमी तेलकट लागतील.