अशी वेळ कुणावरच नको... ``मला बोलता यायला लागलं, पण पप्पा अजूनही माझ्याशी बोलत नाहीत``
नियतीला चिमुकल्यांचीही दया नाहीय, त्या प्राध्यापकाच्या वयस्कर आईचीही नाही.
राजकोट : ही लहान मुलं रोज आपल्या बाबांशी हक्काने खेळतात. मुलगी तर आपल्या बाबाला मिठी मारुन गुज गोष्टी करते. कानाजवळ हळू आवाजात बोलणारी ही लहानगी. बाबा काहीच उत्तर देत नाही, नुसता पाहतो, म्हणून आपल्या प्रिय बाबावर संताप व्यक्त करते, आणि म्हणते ''तू जर आता माझ्याशी बोलला नाही ना, तर मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही.'' हे दु:ख पाहणाऱ्याला वाटतं, अशी वेळ कुणावरही येऊ नये.
दु:ख ठाण मांडून बसलंय, आणि मुलं बाबाला कवटाळून बसलेत...
कुणाचाही अकाली मृत्यू झाला, तर त्याच्यामागे असणाऱ्या लहानग्यांवर याचा आयुष्यभर परिणाम होतो. मृत्यूनंतर अशा कठीण परिस्थिती का असेना कुठे ना कुठे हे दु:ख विसरुन पुढे वाट काढावी लागते, हा जीवनाचा नियम आहे. पण इथे हा प्राध्यापक जिवंत असूनही त्यामागचं दु:ख आणखी मोठं आहे.
नियतीला चिमुकल्यांची कधी तरी दया येईल का?
कारण राजकोटच्या या प्राध्यापकाचं कुटूंब मागील ४ महिन्यांपासून रडतंय, ते काही वेळ थांबतात, पुन्हा रडतात, त्यांचे अश्रू थांबत नाहीयत. दु:ख त्यांच्या घरात ठाण मांडून बसलंय. नियतीला चिमुकल्यांचीही दया नाहीय, त्या प्राध्यापकाच्या वयस्कर आईचीही नाही.
आई रोज त्याला म्हणते बेटा जेवायला उठ...पण
पत्नी आणि मुलांप्रमाणे राकेशची म्हातारी आई देखील दु:खात आहे. ती प्रत्येक वेळी जेव्हा तिला भूक लागते आणि सर्व जण घरात जेवतात तेव्हा ती त्याला जेवायला उठवते. त्याच्या पसंतीचं जेवण बनवते जेवायला उठवते, पण तो उठत नाही.
ती आता पप्पांच्या गळ्यात पडलेली असते
राकेश यांची मुलगी देखील त्यांना जेवायला उठवते, बोलते, पण ते बोलत नाहीत, ते खेळणं विसरलीय. ती आता पप्पांच्या गळ्यात पडलेली असते. तिचे डोळे भरुन येतात, आता परिवाराला काहीतरी चमत्कार घडेल आणि राकेश हे कोम्यातून बाहेर येतील अशी अपेक्षा आहे.
तब्येत बिघडल्यानंतर व्हेंटिलेटरवर
राजकोट शहरातील कोठारिया भागातील हे ३१ वर्षीय प्रोफेसर राकेश वाघासिया यांना एप्रिल महिन्यात कोरोना झाला. प्रोफेसर राकेश वाघासिया यांची तब्येत बिघडल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं, पण यानंतर ते कोरोनात गेले, याच वेळी त्यांची पत्नी देखील गर्भवती होती, त्या आधी त्यांना ३ वर्षाची मुलगी होती.
याच काळात मुलाचा जन्म झाला
प्रोफेसर राकेश यांची पत्नी नम्रता यांना ही बातमी देण्यात आली नव्हती की, राकेश कोरोना झाल्यानंतर ते कोमात गेले आहेत. पण लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी नम्रता या थेट हॉस्पिटलला पोहोचल्यावर त्यांना कळलं की, नवऱ्याला कोरोना झाला आहे. याच वेळी त्यांनी मुलाला जन्म दिला, पण राकेश यांना माहित नाही की त्यांना मुलगा झाला. जो दररोज राकेश यांच्याजवळ खेळत असतो. पण राकेश कोमात असल्याने काहीच बोलत नाही.
तब्येतीत अजूनही काही सुधारणा नाही
कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं की, हे मागील ५ महिन्यांपासून सुरु आहे, राकेश यांच्या तब्येतीत अजून कोणतीही सुधारणा दिसून आलेली नाही. इलाजावर ३ महिन्यात भयंकर खर्च झाला आहे, यात घरातील सर्व पैसा खर्च झाला आहे, आता खर्च होत नाही, म्हणून त्यांना घरी आणण्यात आलं आहे. घरुनच त्यांच्यावर इलाज सुरु आहे.
राकेश यांच्यावर इलाज करण्यासाठी बंगळुरु, चेन्नई आणि अमेरिकतूनही डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आहे, पण तब्येतीत कोणताही फरक दिसून येत नाहीय.
राकेश राजकोट एका खासगी कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेत, लॉकडाऊन काळात त्यांना अर्धा पगार मिळत होता. पुढील महिन्यापासून त्याचा पगारही बंद झाला आहे. यापुढे घरखर्च चालवण्याचाही प्रश्न उपस्थित राहणार आहे. राकेशचे शेजारी सांगतात, हे परिवार नेहमीच आर्थिक बाबतीत सक्षम होतं, ते नेहमीच अनेक संकटात आलेल्यांना मदत करत होते, पण आज तेच संकटात आलेले आहेत.