मुंबई : देशात कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत आहे. दररोज 50 हजाराहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. कोरोना संसर्गाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता भारतात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात कोरोना रुग्णांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या माहितीनुसार आता देशात कोरोना रुग्णांचा रिक्वरी रेट 67.62 टक्के आहे.



आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात 20,27,075 कोरोना रुग्णांची पुष्टी केली आहे. या व्यतिरिक्त देशात कोरोनामुळे 41,585 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 13,78,106 रुग्णांनी कोरोना मात केली आहे. अजूनही  6,07,384 कोरोना  रुग्ण उपचार घेत आहेत.


सर्वाधिक प्रभावित राज्य


देशात अशी 6 राज्ये आहेत जिथे कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या एक लाखाहून अधिक झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 1 लाखाच्या वर गेली आहे.


कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्राचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत कोरोनाचे 4.79 लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तामिळनाडूमध्ये 2.79 लाख, आंध्र प्रदेशात 1.96 लाख, कर्नाटकात 1.88 लाख, दिल्लीत 1.41 लाख आणि उत्तर प्रदेशातील 1.08 लाख कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.