नवी दिल्ली : भारतात कोरोना संक्रमणाची संख्या आता 9 लाखांच्या पुढे गेली आहे. दरम्यान, कोरोनामुळे 23 हजार 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अहवालानुसार सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत एका दिवसात 28,701 रुग्ण वाढले होते. ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 8,78,254 इतकी झाली होती. पण 12 तासांत ही संख्या नऊ लाखांच्या पुढे गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासात महाराष्ट्रात कोरोनाचे 6497 रुग्ण वाढले आहेत. राज्यात कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 2,60,924 वर पोहचली आहे. तर 193 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह राज्यात कोरोनामुळे मृतांची संख्या 10,482 वर पोहोचली आहे.


सोमवारी तामिळनाडूमध्ये कोरोनाचे 4,328 नवे रुग्ण वाढले आहेत. तर 66 लोकांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 3,035 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढून 1,42,798 झाली आहे. यापैकी 92,567 रूग्ण बरे झाले आहेत, तर 48,196 रुग्ण उपचार घेत आहेत. तामिळनाडूमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत 2,032 जणांचा मृत्यू झाला आहे.


कर्नाटकात गेल्या 24 तासांत 2738 रुग्ण वाढले आहेत. यापैकी 1315 प्रकरणे एकट्या बंगळुरूमध्ये आहेत. तर 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 839 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


गेल्या 24 तासांत देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचे 1246 रुग्ण वाढले आहेत. तर 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासह, दिल्लीमध्ये कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 1,13,740 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 3,411 झाली आहे.



- आंध्र प्रदेशात गेल्या 24 तासांत 1935 नवीन रुग्ण वाढले आहेत. तर 36 लोकांचा मृत्यू झाला आहे.


- बिहारमध्ये गेल्या 24 तासांत 1116 नवीन रुग्ण वाढले आहेत. कोरोना संक्रमणाची एकूण संख्या 17,421 वर पोहोचली आहे.


- राजस्थानमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,435 नवीन रुग्ण आढळले आहेत.


- तेलंगणामध्ये गेल्या 24 तासांत 1550 नवीन रुग्ण आढळले आहेत.


- उत्तर प्रदेशात कोरोनाचे 1664  नवीन रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात राज्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत.