नवी दिल्ली : कोरोनाचे संकट पळवून लावण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नये म्हणून कर्फ्यू अर्थात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जर कोणी संचारबंदीचे उल्लंघन केले किंवा ती मोडली तर दोन वर्षांपर्यंतची जेल होऊ शकते. तसा आदेश केंद्र सरकारने लागू केला आहे. देशव्यापी २१ दिवसांचा संचारबंदीची कठोरपणे अंमलबजावणी करण्याचं केंद्रीय गृह मंत्रालयान ठरवले आहे. या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्याला आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा करण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या २१ दिवसांच्या लोकडाऊन दरम्यान राज्यात आणि केंद्रशासित प्रदेश आणि मधली सर्व सरकारी-निमसरकारी कार्यालयबंद राहतील. तसेच खाजगी कार्यालय देखील बंद राहणार आहेत. त्यामुळे काम नसताना कोणी संचारबंदीचे उल्लंघन केले तर त्यांचे काही खरं नाह. मात्र नव्या सूचनांनुसार किराणामालाच दुकान, दूध आणि दुग्धजन्य पदार्थची विक्री करणारी  दुकान, पेट्रोल पंप गॅस सिलिंडर विक्री दुकान खुली राहतील. या जीवनावश्यक वस्तू घरपोच पुरवण्याला जिल्हा प्रशासनाने प्रोत्साहन द्यावे, असेही गृहमंत्रालयाने सांगितले आहे.


शैक्षणिक संस्था, संशोधन संस्था बंदच राहतील. तसेच कोणत्याही धार्मिक कार्यक्रमास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच अंत्ययात्रेत वीस पेक्षा जास्त लोकांनी जमू नये, अश्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालय आणि त्याच्याशी संबंधित आस्थापन खुली राहतील.  रुग्णवाहिका, वैद्यकीयसेवांशी संबंधित कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी  तसेच साफ सफाई कामगार यांची ने-आण करणाऱ्या वाहनांना या निर्बंधतून सूट देण्यात आली आहे.


शेअर बाजार, बँका, विमा कार्यालयं आणि एटीएम चालू राहतील. खासगी सुरक्षा सेवा, पेट्रोल पंप, वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमे, दूरसंवाद यंत्रणा, इंटरनेट इत्यादी चालू राहील मात्र त्यातही शक्यतो घरुन काम करण्यावर भर द्यायचा आहे. बंदीमुळे अडकलेल्या किंवा अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांची राहण्याची सोय असलेली किंवा विलगीकरणासाठी वापरली गेलेली वगळता सर्व हॉटेल्स बंद राहतील.