गाझियाबाद : कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यामुळे अनेक जण खबरदारी घेत आहेत. तर काही लोक सांगूनही ऐकत नाहीत. काम नसताना रस्त्यावर फिरताना आढळत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. तसेच वेळप्रसंगी वीज कनेक्शन तोडण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या अनेक राज्यांत कामगार आणि लोक अडकले आहेत. त्यांना श्रमिक रेल्वेने आपल्या राज्यात मार्गस्थ करण्यात येत आहेत. त्यामुळे या लोकांवर नवे संकट उभे राहीले आहे, अशीच चर्चा सुरु झाली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाव्हायरसने देशभरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशमधीस गाझियाबादमध्ये कोरोनाने मोठा प्रभाव दिसून येत आहे. राजनगर एक्सटेंशनची रिव्हर हाइट सोसायटी बाहेरुन येणाऱ्या लोकांसाठी बंद केली गेली आहे. या नियमांचा जो कोणी भंग करील त्यांच्यावर मोठा दंड आकरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या नियमाचा भंग कोणी करणार नाही आणि बाहेरची व्यक्ती सोसायटीत येणार नाही. जर हा नियम तोडला तर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


हा नियम बनविताना जे कोणी सदस्य सोसायटीत आपल्या नातेवाईक आणतील त्यांना ११००० रुपये दंड भरावा लागेल. जर लोकांनी यांनी हा नियम पाळला नाही तर त्यांचे विद्युत कनेक्शन तोडले जाईल. हे सर्व पैसे पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले जातील. कारण सोसायटी सतत लोकांना आवाहन करीत आहे की कोणीही बाहेरच्या व्यक्तीला सोसायटीत आणू नका. जर कोणाला कोरोनाची लागण झाली तर संपूर्ण सोसायटी सील केली जाईल.



सोसायटीत १५०० फ्लॅट्स आहेत, ४००० हून अधिक लोक राहतात, जर सोसायटी सील केली तर लोकांना बर्‍याच अडचणींना तोंड द्यावे लागले. हे सर्व पाहता सोसायटीच्या आरडब्ल्यूएने हा निर्णय घेतला आहे, घरी पाहुण्यांना बोलावले तर ११ हजारांचा दंड आणि वीज कनेक्शन तोडणार.