मुंबई : दिल्लीतील कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत आहे. (Corona in Delhi) कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता दिल्ली सरकारने सार्वजनिक ठिकाणी मास्क न (without masks) घालण्यासाठी दंडाची रक्कम ५०० ते २००० रुपयांपर्यंत वाढविली आहे. कोरोनाबाबतचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका पुन्हा वाढला तरी दिल्लीकरांना कोरोनाचे अजिबात गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सरकारने मास्क न वापरणाऱ्यांना दणका देण्यास सुरुवात केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिल्लीमध्ये कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. बुधवारी शहरात तब्बल १३१ जणांचा मृत्यू झाला असून हा आजवरचा सर्वात मोठा आकडा आहे. तर दिवसभरात ७ हजार ४८६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन अजिबात केले जात नाही. सरकारने वारंवार सूचना करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.


कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच नव्या ६६० ICU खाटा उपलब्ध करून देणार आहे. तसंच रेल्वेदेखील ८०० बेड्स असलेले कोच दिल्लीसाठी देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून कोरोनाची दुसरी लाट कशी हाताळायची, यावर या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.


कोरोना संकटामुळे सध्या ५०० रुपयांचा दंड वसूल करत आहे. सरकारने दंडाची रक्कम वाढवली आहे. मात्र, अद्याप दंड  करणाऱ्या कर्मचार्‍यांना अधिसूचना मिळालेली नाही. यामुळे केवळ ५०० रुपयांचा दंड वसूल केला जात आहे. त्याचबरोबर रेल्वेगाड्यांबरोबरच बस थांबवून मास्क न घालता फिराणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. 


दंड टाळण्यासाठी लोक अनेक कारणे देत आहेत. तपासणी दरम्यान, बरेच लोक आपली चूक मान्य करीत दंड भरत आहेत, तर बरेच लोक कर्मचार्‍यांशी वाद घालत आहेत. बरेच जण निमित्त देत आहेत की आम्ही मास्क लावले होते, आपण पाहिले नाही. काहीजण असे म्हणत आहेत की आम्ही २४ तास मास्क लावू शकत नाही. बरेच जण असे सांगत आहेत की आम्ही मास्क घातला होता, नुकताच काढला आहे. त्याचवेळी, बरेच जण असे म्हणत आहेत की, प्रत्येकाला कारमध्ये  मास्क घालावे जरुरी आहे का, पुढे बसणाऱ्यांना मास्क जरुरी आहे.


अधिसूचना जारी होताच २००० रुपयांचा दंड


अंमलबजावणी अधिकारी राजीव कुमार म्हणाले की, दिल्लीत कोरोना सातत्याने वाढत आहे. त्यामुळे तपासणीचा वेग वाढविण्यात आला आहे. सध्या ५०० रुपयांचा दंड वसूल करत आहोत. अधिसूचना मिळताच २००० रुपयांचे चलन किंवा दंड वसूल केल जाईल.