मुंबई :  कोरोनाचा (Corona) कहर बऱ्यापैकी संपल्यामुळे निर्बंध पूर्णपणे शिथिल करण्यात आले आहेत. मात्र कोरोना अजूनही गेलेला नाही. कोरोनाची चौथी लाट (Corona Fourth Wave) येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच ती केव्हा येणार, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आलाय. अवघ्या काही दिवसांनी कोरोनाची चौथी लाट येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुन्हा भितीचं वातावरण पाहायला मिळतंय. (corona fourth wave may be come in june 2022 iit kanpur report xe variant)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कानपूर IITमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून 22 जूनच्या आसपास देशात चौथी लाट सुरू होण्याचा अंदाज आहे. ओमायक्रॉनच्या XE या व्हेरियंटमुळे चौथ्या लाटेचा धोका वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आलाय. ऑगस्टमध्ये कोरोनाची चौथी लाट आपल्या सर्वोच्च बिंदूवर असेल, असाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.