नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तुरुंगामधील अनेक कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान हरियाणामधील कारागृहामध्ये बंदी असलेल्या एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याचे लक्षात येताच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे कैद्याला कोरोना झाल्याचे समजताच त्याला जामीन देखील मंजूर करण्यात आला होता. परंतू त्याने रुग्णालयातील परिस्थितीचा अंदाज घेत तेथून पळ काढला. रुग्णालयातून रुग्ण पळाल्याची सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस कैद्याचा शोध घेत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कैद्याने डॉक्टरांचं पीपीई किट घालून रुग्णालयातून पळ काढला आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान कैद्यावर करडी नजर ठेवण्यासाठी पोलीस देखील तैनात करण्यात आले होते. परंतु कैद्याला जामीन मंजूर झाल्यामुळे पोलिसांची तुकडी देखील रुग्णालयातून हटवण्यात आली होती. 
 
रात्रीची वेळ साधून कैद्याने रुग्णालयातून पळ काढला. पीपीई किट घातल्यामुळे कैदी कोणी डॉक्टर किंवा नर्स असेल अशा विचाराचे त्यावर कोणी लक्ष दिले नाही. जींदचे डीएसपी धर्मवीर सिंह यांच्या म्हणण्यानुसार कोरोना बाधित कैदी शोधण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. त्याला लवकरच पकडण्यात येईल असं देखील ते म्हणाले. 


दरम्यान, रुग्णाने पळ काढल्यामुळे कोरोना रुग्णांच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता  वर्तवण्यात  येत आहे. शिवाय कोरोनाची लागण झालेल्या आणि पळूण जाणाऱ्या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात  वाढ झाली आहे. तर ही भीती आरोग्य विभागाला देखील सतावत आहे.