मुंबई : देशासह महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनानं थैमान घालायला सुरुवात केली आहे. त्यामुळं हजारापर्यंत वाढणारी कोरोना रुग्णसंख्या राज्यात दररोज सरासरी 5 ते 6 हजारांनी वाढू लागली आहे. त्यात 10 वर्षापर्यंतच्या लहान मुलांमध्ये कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. सध्या शाळा बंद असल्या तरी गर्दीच्या ठिकाणी जाणं, बाहेर खेळणं यामुळे लहान मुलंही कोरोनाच्या कचाट्यात येता आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वर्षभरात 70 हजार मुलांना कोरोना झाला होता. मात्र आजच्या घडीला राज्यात 10 वर्षांखालील मुले बाधित होण्याचं प्रमाण 3.35 टक्के आहे. लहान मुलांमध्ये चांगली रोगप्रतिकार शक्ती असल्याने त्यांच्यात कोणतीही गंभीर लक्षणं दिसत नाहीत, पण ते कोरोनाचे कॅरियर बनतात. 


लहान मुलांचा कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय करायला हवं? कोरोना पॉझिटिव्ह मुलं घरातल्या इतरांसाठी कॅरियर ठरु शकतात का? मुलांमध्ये कोरोना वाढतोय तर अजून पुढचे काही महिने शाळा बंद ठेवाव्यात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.