मुंबई : कोरोनाच्या पुढील लाटेवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न देशातील इतर राज्यांत तीव्र झाले आहेत. अहमदाबादनंतर सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्येही रात्री कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सरकार दिल्ली-मुंबई विमान आणि रेल्वे सेवा बंद करण्याचा विचार करीत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटना लक्षात घेता हरियाणामधील सर्व शाळा आणि महाविद्यालये 30 नोव्हेंबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षकांना शाळेत जाण्यासही मनाई असेल. मुंबई महापालिकेनेही 31 डिसेंबरपर्यंत सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.


देशातील कोरोनाचा वेग मंदावला असेल, पण राजधानी दिल्लीत हा वेग अनियंत्रित झाला आहे. भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या 90 लाखांवर गेली आहे. गुरुवारी भारतात कोरोनाचे 45 हजार 882 रुग्ण आढळले. त्यानंतर संसर्ग झालेल्या कोरोनाची संख्या 90 लाख 4 हजार 365 वर गेली. गुरुवारी कोरोनामुळे 584 लोकांना मृत्यू झाला आहे.


कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अनेक जण अजूनही निष्काळजीपणे वावरत आहेत. बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. यामुळे चिंता नक्कीच वाढल्या आहेत.


इतर देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आल्याने काही देशांना पुन्हा लॉक़डाऊनची घोषणा करावी लागली. कोरोनावर अजूनही तरी कोणतंही औषध नसल्याने लॉकडाऊन हाच एकमेव मार्ग विविध देशांच्या सरकारपुढे आहे.