मुंबई : कोरोना साथीच्या काळात केंद्र सरकारने म्हटले की, भारतात पुरेसे वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्ध आहे पण त्याला रुग्णालयात नेण्याचे आव्हान आहे. गृह मंत्रालयाच्या सचिवांनी म्हटलं की, ऑक्सिजनसाठी घाबरून जाण्याची गरज नाही. आम्ही त्याच्या वाहतुकीचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहोत. भारत परदेशातून ऑक्सिजन टँकर खरेदी आणि भाड्याने घेत आहे. ऑक्सिजन टँकरची वाहतूक हे एक मोठे आव्हान आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

GPS ट्रॅकिंग


ते म्हणाले की, जीपीएसद्वारे ऑक्सिजन वाहून नेणार्‍या टँकरवर सरकारचा वॉच आहे. आता अशी वेळ आली आहे जेव्हा लोकांना घराच्या आतदेखील मास्क घालावा लागत आहे. पण घाबरून जाण्याची गरज नाही.


या कालावधीत महिला कोरोनावरील लस घेऊ शकतात. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, या कोविड 19 परिस्थितीत विनाकारण बाहेर जाऊ नका. मास्क घरामध्ये देखील घातले पाहिजे. आपल्या घरी पाहुण्यांना आमंत्रित करू नका. लसीकरणाची गती कमी होणार नाही.


केंद्राने म्हटले आहे की, संशोधनातून असे दिसून आले आहे की एक व्यक्ती 30 दिवसात 406 लोकांना संक्रमित करू शकतो. महाराष्ट्रासह आठ राज्यात कोरोनाचे 1 लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात आणि तामिळनाडू अशी एक लाखाहून अधिक सक्रिय प्रकरणे असलेली राज्ये आहेत.


देशात अनेक जणांना सौम्य लक्षणं असल्याने ते घरातच होम आयसोलेशनमध्ये राहून उपचार घेत आहेत. पण अशा वेळी कुटुंबातील व्यक्तींना लागण होऊ नये हे मोठं आव्हान असतं. नेहमी बाहेर कामासाठी जाणाऱ्या व्यक्तींनी घरी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण तो संक्रमित झाल्यानंतर घरातील व्यक्तींना देखील संक्रमण होऊ नये.