मुंबई : देशात कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा उद्रेक कमी होत आहे. मात्र, दुसरीकडे काही जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना डोकेवर काढत असल्याने कोरोनाने देशाची चिंता पुन्हा वाढवली आहे.(Corona outbreak in India) देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. काल दिवसभरात देशात कोरोनाचे 41 हजार 806 नवे रुग्ण आढळून आलेत. तर कोरोनामुळे 581जणांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात 39 हजार 130 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 4 लाख 32 हजार 41वर गेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आतापर्यंत 30987880 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 30143850  रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 411989 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात  432041 बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गंभीर इशारा दिला आहे. अनेक लोक कोविड नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे हा गंभीर इशारा देण्यात आला आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे.


मात्र नागरीकांनी मोठ्या प्रमाणाक गर्दी करायला सुरुवात केली आहे. तज्ज्ञांनी कोरोना साथीच्या तिसर्‍या लाटेचा इशारा दिल्यानंतरही लोक खबरदारी घेत नाहीत. राज्यांनी घातलेले निर्बंध शिथिल केल्यानंतर लोक पर्यटनस्थळे आणि बाजारपेठेत मोठी गर्दी करत आहेत. कोविड नियम पाळले नाही तर पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू करा, अशा सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना दिल्या आहेत.



दुसरीकडे लस गोंधळाचं खापर पुन्हा एकदा राज्यांवर फोडण्यात आले आहे. राज्यांना लसमात्रांच्या पुरवठय़ाची पूर्वसूचना दिली जाते. तरीही, लसीकरण केंद्रांवर लांबलचक रांगा लागत असतील तर गैरव्यवस्थापन कोणामुळे होते आणि समस्यांचे केंद्र नेमके कुठे आहे, हे स्पष्ट होते असं ट्वीट केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. 


मुंबईत आजपासून गरोदर महिलांचे लसीकरण सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यात 35 ठिकाणी हे लसीकरण होणार आहे. गरोदर महिलांना कोणत्याही महिन्यांत कोरोना लस  घेता येणार आहे.. पूर्वनोंदणी न करता लसीकरणासाठी येण्याची मुभा या महिलांना देण्यात येणार आहे.