नवी दिल्ली : उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात आणि छत्तीसगडमध्ये कोरोचा उच्चांक ( peak) येऊन गेला. आतात कोरोना संसर्गाचा कल उताराकडे आहे. संसर्ग होणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. परंतु कर्नाटक, आंध्र प्रदेश, आणि तामिळनाडूमध्ये कोरोनाचा उच्चांक यायला अद्याप वेळ आहे. त्याकरीता सतर्कता बाळगणं गरजेचं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सर्वाधिक धोका बिहार, केरळ, झारखंड, राजस्थान, हरियाणा, तेलंगानामध्ये आहे. जिथे कोरोना संसर्ग कमी अधिक होत आहे.


आयआयटीचे प्रो. महेंद्र कुमार वर्मा यांनी कोरोनाच्या प्रतिदिवस संसर्गाच्या आधारावर सर (द सस्पिटेबल इंफेक्टेड रेसिसटेंट)  नावाचे मॉडेल तयार केले आहे. याआधारावर कोरोना संसर्ग वाढणे किंवा कमी होण्याचे आकलन केले जाते. 


वर्मा यांनी प्रत्येक राज्यासाठी वेगळा रिपोर्ट तयार केला आहे. प्रो. वर्मा यांनी अपल्या रिपोर्टमध्ये टीपीआर आणि सीएफआरचे देखील आकलन केले आहे. त्यांनी आरोग्य मंत्रालयाकडे हा रिपोर्ट पाठवला आहे.