Corona Return : भारतात गेल्या काही दिवसात सातत्याने कोरोना (Corona) रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून WHO ने चिंता व्यक्त केली आहे. जगातील अनेक देशांमध्ये ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे (Omicron Variant) रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात सध्या ओमायक्रॉनच्या 800 पेक्षा अधिक सबव्हेरिएंटचा धोका आहे. भारतात ओमायक्रॉनच्या XBB 1.16 या नव्या व्हेरियंटची (Corona New Varient) लाट झपाट्यानं पसरतेय. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने COVID-19 लसीकरणाबाबत नव्या सूचना केल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

WHO ने केल्या सूचना
देशात गेल्या चोवीस तासात दोन हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढलीय. त्यामुळे वेळीच खबरदारीचे उपाय करण्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलं आहे. वृद्ध आणि सहव्याधी असलेल्या लोकांना पुन्हा एकदा बुस्टर डोस देण्यात यावा असं WHO ने सूचवलं आहे. बुस्टरचे दोन्ही डोस घेऊन आता जवळपास 12 महिन्यांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे वृद्ध आणि सहव्याधी असलेल्यांना खबरदारीचा उपाय म्हणून बुस्टर डोस देण्यात यावा असं WHO ने म्हटलं आहे. 


लहान मुलांचं लसीकरणाला सध्या प्राथमिकता नसल्याचंही WHO ने म्हटलं आहे. लहान मुलांच्या लसीकरणाआधी वृद्ध आणि सहव्याधी असणाऱ्यांच्या लसीकरणावर भर देण्याची गरज असल्याचंह WHO ने सांगितलं.


कोरोना पुन्हा पसरतोय
WHO वर्तवल्या अंदाजानुसार कोरोनाचा प्रभाव कमी व्हायला हवा होता, पण असं होताना दिसत नाहीए. कोरोनाने पुन्हा एकदा जगभरात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. कोरोना पुन्हा एकाद धोकादायक होऊ नये यासाठी सर्व देशांनी सज्जा राहायला हवं असं जागतिक आरोग्य संघनेने म्हटलं आहे. 


अनेक देशात कोरोनाचं संकट
अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. चीनमध्ये गेल्या डिसेंबर महिन्यात तब्बल 250 मिलिअन कोविड प्रकरण समोर आली. अमेरिका आणि सिंगापूरमध्येही कोरोना रुग्ण सातत्याने वाढत आहेत. जपान कोरोनाच्या आठव्या लाटेचा सामना करतोय. तर दक्षिण कोरियात एका दिवसात 70 हजाराहून अधिक प्रकरणं नोंदवली गेली आहेत.