Corona Updates : चीनमध्ये कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलेलं असतानाच आता संपूर्ण जगभरात या विषाणूच्या संसर्गाचं भयावह रुप पाहायला मिळत आहे. संपूर्ण जगारीत काही वैज्ञानिकांनाही कोरोनाच्या या लाटेची धास्ती असून यामध्ये अनेक बळी जाण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केल्याचं म्हटलं जात आहे. (Corona updates india at risk of spike in covid cases read details latest Marathi news )


भारतात आलेल्या परदेशी नागरिकांना कोरोना 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोधगयामध्ये आलेल्या जवळपास 11 विदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं आणि बिहारमध्ये त्यामुळे कमाल दहशतीचं वातावरण पसरलं आहे. इथं आलेल्या थायलंडच्या 9, म्यानमारच्या 1 आणि इंग्लंडच्या एका प्रवाशाला कोरोनाची लागण झाली आहे. तर, दिल्ली विमानतळावर 4 परदेशी नागरिकांना कोरोना झाल्याचं चाचणी अहवालाचून निष्पन्न झालं. 


गयामध्ये धर्मगुरु दलाई लामा यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या या परदेशी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यामुळं आता या धार्मिक स्थळावर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्याकत येत आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला सावधगिरी म्हणून बोधगया येथील एका हॉटेलमध्ये या नागरिकांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतात बहुतांश ठिकाणी सतर्कता म्हणून काही नियमांची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. सध्याच्या घडीला देशातील एका राज्यात मास्कसक्ती करण्यात आली असून शाळा, कॉलेज, सिनेमागृह, पब येथे ही मास्कसक्ती लागू असेल. हे राज्य म्हणजे कर्नाटक. इथं नव्या वर्षाच्या स्वागतासाठीसुद्धा नागरिकांसाठी सुधारित नियमावली तयार करण्यात आली आहे. फक्त कर्नाटकच नव्हे, महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यांमध्येसुद्धा कोरोनाच्या धर्तीवर काही कठोर पावलं उचलण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे. 


अपवाद ठरतंय ते म्हणजे गोवा. इथं सध्याचा माहोल पाहता कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसल्याची माहिती खुद्द मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. सावंत यांच्या माहितीनुसार गोव्यात आलेल्या परदेशी नागरिकांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येईल पण, तूर्तास इथं कोणतेही निर्बंध नसतील. 


 


पाकिस्तानला चीनची भीती? 


तिथे चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढत असतानाच दुसरीकडे पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानमधील नागिरकांनी चीनची लस घेतली आहे. मुळात कोरोनाविरोधात चीनची लस फारशी प्रभावी ठरलेली नाही. या परिस्थितीत चीनच्या मैत्रीखातर पाकिस्ताननं या लसीवर विश्वास दाखवून आपल्या जनतेला चिनी लसीचे डोस दिले होते. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.  


 


ब्रिटनमध्ये कोरोनाची पाचवी लाट 


ब्रिटनमध्ये चीनप्रमाणंच विनाशकारी कोरोनाची पाचवी लाट दाखल झाली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने इथं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशा परिस्थितीत जानेवारीत कोरोनाचा उच्चांक होण्याची भिती व्यक्त केली जातेय.