भारतीयांना अवघ्या इतक्या रुपयांत मिळणार corona vaccine
सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया (SII) आणि केंद्र सरकार मिळून वॅक्सिनची किंमत ठरवण्यासाठी एका करारावर सह्या करणार आहेत.
नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या कोरोना वॅक्सिन (Corona Vaccine)ची वाट पाहतंय. दररोज वॅक्सिन संदर्भात नव्या बातम्या येतायत. सिरम इंस्टिट्यूट ऑफ इंडीया (SII) आणि केंद्र सरकार मिळून वॅक्सिनची किंमत ठरवण्यासाठी एका करारावर सह्या करणार आहेत.
२५० रुपयांना वॅक्सिन
सिरीम इंस्टिट्यूटकडून मोठ्या प्रमाणात वॅक्सिनची अपेक्षा केंद्र सरकारला आहे. ज्यांनी AstraZeneca ची वॅक्सिन Covishiled च्या आपत्कालीन उपयोगाची परवानगी मागितली आहे. भारत आणि सिरमच्या करारानुसार वॅक्सिनची किंमत २५० रुपयांपर्यंत असू शकते. वॅक्सिनसंदर्भात काम करणाऱ्या व्यक्तींच्या हवाल्याने बिझनेस स्टॅण्डर्डने यासंदर्भातील वृत्त दिलंय.
जास्त ऑर्डर दिल्यास स्वस्त
भारताच्या खासगी बाजारात वॅक्सिनची किंमत हजार रुपये प्रति डोस असेल. पण जास्त मागणी असल्यास करार करणाऱ्या सरकारला यापेक्षा कमी किंमतीत वॅक्सिन उपलब्ध करुन दिली जाईल असे सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडीयाचे मुख्य कार्यकाळी अधिकारी (CEO) अदार पूनावाला यांनी म्हटलंय.
वॅक्सिन पुरवण्याच्या यादीमध्ये पहीला क्रमांक भारताचा असेल असे देखील अदार पूनावाला यांनी म्हटलंय. इतर देशांना वॅक्सिन पुरवण्याच्या स्पर्धेत सिरम इंस्टिट्यूट भारतीयांची मागणी पूर्ण करण्यावर अधिक भर देणार आहे.