नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ९,१५२ वर जाऊन पोहोचली आहे. आत्तापर्यंत ३०८ लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मागच्या २४ तासात ३५ जणांना जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीएसआयआरसोबत कोरोनाच्या टेस्ट होत आहेत. कोरोनाचा सामना करण्यासाठी ५ हजार स्वयंसेवकांनी योगदान दिलं आहे. आत्तापर्यंत ३० कोटी लोकांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. देशात कोरोना टेस्टच्या किटची कोणतीही कमी नाही, असं लव अग्रवाल म्हणाले. 


१५ राज्यांमधले २५ जिल्हे कोरोनामुळे प्रभावित झाले होते, अशा जिल्ह्यांमध्ये मागच्या १४ दिवसात एकही रुग्ण आढळलेला नाही. या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार रोखला गेला आहे. हे देशासाठी दिलासादायक आहे, असं लव अग्रवाल यांनी सांगितलं.


एक दिवसआधी १२ एप्रिलला समोर आलेल्या माहितीनुसार मागच्या ४ दिवसात देशाच्या ८० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा जुना संसर्ग पुन्हा पसरला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशातल्या ४०० जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.