मुंबई  : फक्त देशातचं नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचे संकेत सतत देण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होणार असल्याचा वैज्ञानिकांचा अंदाज आहे. त्यामुळे काळजी घेण्याची अत्यंत गरज आहे. गुरूवारी 41 हजार 195 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. याच दरम्यान गेल्या 5 दिवसांत बंगळुरूमध्ये 242 मुल कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येत्या दिवसांत कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची चेतावणी वैज्ञानिकांनी दर्शविली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभुमीवर पालिक सज्ज झाली आहे. कोरोना चाचण्या वाढवण्याचा आणि प्रत्येक बाधितांच्या संपर्कातील 20 व्यक्तीचा शोध घेण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत. सात परिमंडळ आणि 24 विभागांना हे आदेश देण्यात आले आहेत.


कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण एकमेव पर्याय असल्याचं सांगितलं जात आहे. पण पुरेशा लससाठ्याअभावी आज आणि उद्या मुंबईत लस मिळणार नाही. मुंबईत आज रात्री उशिरा लस येणार आहे. त्याचं वितरण शनिवारी होईल. त्यामुळे शनिवारी मुंबईकरांना सरकारी केंद्रांवर लस मिळेल. अर्थात प्रायव्हेट पेड लसीकरण सुरू आहे.


मुंबईत गेल्या 15 दिवसांत लसीकरणात 64 टक्क्यांनी घट झाली आहे. पालिकेला 10 ऑगस्टपर्यंत 1 लाख 49 हजार लसमात्रा मिळाल्या आहेत. जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लसीकरणात घट झाल्याचे दिसत आहे.


कोरोना लसीकरणात उत्तर प्रदेशने आघाडी घेतली आहे. पण दोन्ही मात्रा घेतलेल्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल आहे. एकूण लसीकरणात महाराष्ट्र दुस-या स्थानी आहे. महाराष्ट्रात तब्बल एक कोटी 22 लाख नागरिकांनी लस घेतली आहे.