वॉशिंग्टन : पावसाळ्याच्या दिवसांत डासांमुळे डेग्यू, मलेरियासांरख्या आजारांचा धोका वाढतो. अशात अनेक लोकांमध्ये डासांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो का? अशा अनेक शंका उपस्थित होत आहेत. याबाबत शास्त्रज्ञांनी माहिती देत, डासांमुळे कोरोना संसर्ग होत नसल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेतील कॅनसास स्टेट युनिव्हर्सिटीमधील Kansas State University संशोधक स्टीफन हिग्ज यांनी सांगितलं की, जागतिक आरोग्य संघटनेने ठामपणे सांगितलं आहे की, डासांद्वारे विषाणूचा प्रसार होऊ शकत नाही. आम्ही केलेल्या अभ्यासानुसार, पहिल्यांदाच हा दावा सिद्ध करण्यासाठी आकडेवारी सादर केली गेली. विद्यापीठाच्या जैविक संवर्धन संशोधन संस्थेमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, व्हायरस डासांच्या तीन सामान्य प्रजातींमध्ये प्रजनन करण्यास असमर्थ आहे आणि त्यामुळे व्हायरस डासांद्वारे माणासांपर्यंत पोहचू शकत नाही. 


तुम्ही टीव्ही, मोबाईल सुरू ठेवून झोपताय? ही अत्यंत महत्वाची बातमी


शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीला डास चावला, तरी त्या व्यक्तीच्या रक्तात असलेले कोरोना विषाणू डासांच्या आत जगू शकत नाही, म्हणूनच डास दुसर्‍या व्यक्तीला चावल्यास त्याला संसर्ग होण्याचा धोका नसतो.