मुंबई : कोरोनाने संपूर्ण जगभरात अक्षरशः धुमाकूळ घालता आहे. आतापर्यंत जगभरात ४.९७ मिलियन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १.८९ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये ३,२७,००० लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. भारतालाही कोरोनाचा मोठा फटका बसला आहे. आतापर्यंत १,०७,००० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यामधून ४२,२९८ रूग्ण बरे झाले असून ३,३०३ लोकांचा जीव गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनावरून आता नेपालचे पंतप्रधान के पी शर्मा ओली यांनी असा दावा केलाय की,'भारतातून येणारं कोरोना व्हायरसचं संक्रमण हे चीन आणि इटलीतून येणाऱ्या संक्रमणापेक्षा अधिक घातक आहे. देशात कोविड-१९ च्या वाढत्या आकड्याला भारतात अवैध पद्धतीने येणाऱ्या नागरिकांना जबाबदार धरलं आहे.'


ओली यांनी मंगळवारी कोविड-१९ या जागतिक महामारीबद्दल संसदेत सांगितलं की,'बाहेरून येणाऱ्या लोकांमुळे नेपाळमधील कोरोनाचं संक्रमण रोखणं हे कठीण झालं आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक रूग्णांनी नेपाळमध्ये प्रवेश केला आहे. हा व्हायरस बाहेकून आला आहे. आमच्या इथे तो नव्हता. सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीला आम्ही रोखू शकलो नाही.'


देशासमोर सर्वांत मोठं आव्हान हे कोरोना व्हायरसचं आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाला देशव्यापी लॉकडाऊन तोडणाऱ्या नागरिकांना आणि विशेष करून ज्या नागरिकांनी भारतातून नेपाळमध्ये प्रवेश केला त्यांना जबाबदार धरलं आहे. पुढे ओली असं देखील म्हणाले की,'भारतात येणारा कोरोना व्हायरस हा चीन आणि इटलीपेक्षा देखील घातक आहे.'



भारतातून नेपाळमध्ये अवैधपद्धतीने येणाऱ्या नागरिकांना कोरोना पसरण्यासाठी जबाबदार धरलं आहे. काही स्थानीक प्रतिनिधी आणि पक्षनेत्यांना भारतातून येणाऱ्या लोकांना चाचणी न करता प्रवेश केल्यामुळे त्यांना जबाबदार धरलं आहे. भारताने लिपुलेख दरीतून उत्तराखंडच्या धारचुलाला जोडण्यासाठी एक रस्ता बांधण्यात आला यानंतरच नेपाळ आणि भारतमध्ये सीमा वादाचा प्रश्न निर्माण झाला.