नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसमुळे भारतात मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण पाहायला मिळत आहे. विविध मार्गांनी देशात या विषाणून र मात करण्यासाठीचे प्रयत्न सुरु आहेत. पण, तरीही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांमपुढे  येणारी आव्हानं काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. याच संकट आणि आव्हानाच्या काळात काहीसं दिलासा देणारं वृत्तही पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या माहितीनुसार मंगळवारी सकाळपर्यंत देभरातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा १,४५,३८० वर पोहोचल्याचं सांगण्यात आलं. मागील चोवीस तासांमध्ये देशभरातील कोरोना रुग्णांमध्ये जवळपास ६५३५ इतक्या नव्या रुग्णांची भर पडल्याचं आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं. ज्यामध्ये १४६ रुग्णांचा मृत्यूही झाल्याची माहिती देण्यात आली. 


एकिकडे भारतात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच दुसरीकडे कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला ८०,७२२ कोरोनाग्रस्त रुग्णांवर  देशातील विविध भागांमध्ये उपचार सुरु आहेत. तर, जवळपास ६०,४९० रुग्णांनी या विषाणूवर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांचा हा आकडासुद्धा एक मोठा दिलासा देणारा ठरत आहे. 


वाचा : कोरोनावरील उपचारांमध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनचा वापर थांबवा; WHO चा इशारा


कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर त्यातून सावरणाऱ्या आणि पूर्णपणे बरे होऊन रुग्णालयातून सुट्टी मिळालेली ही रुग्णसंख्या पाहता देशातील रुग्णांचा कोरोनातून सावरण्याचा दर काहीसा दिलासा देणारा ठरत आहे.



आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा रिकव्हरी रेट ४१.६० टक्के इतका आहे. त्यामुळे आता या व्हायरसशी कशा प्रकारे प्रभावी लढा देत त्याचा नायनाट करता येईल याकडेच आरोग्य विभाग लक्ष केंद्रीत करत असल्याचं पाहायला मिळत आहे.