मुंबई : CORONAVIRUS कोरोना काळात वापरून टाकलेले नायट्राईल हँडग्लोजचा पुनर्वापर करणारी टोळी नवी मुंबई पोलिसांनी जेरबंद केली आहे. नवी मुंबईसोबतच औरंगाबाद, बंगळुरू, कोचिन येथून पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५० लाखांचा मुद्द्माल जप्त करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील आठवड्यात नवी मुंबईतील पावणे एमआयडीसीमधून ४ टन हॅन्डग्लोजचा साठा जप्त केल्यानतंर याचे धागेदोरे कोचिन आणि बंगळुरूपर्यंत गेले असल्याची धक्कादायक बाब समोर आली. 


कोरोना काळात वापरून फेकून दिलेल्या नायट्राईल हँडग्लोजचा पुनर्वापर करणारी टोळीला नवी मुंबई क्राईम ब्रान्चने बेड्या ठोकल्या आहेत. क्राईम ब्रान्च अधिकारी राहूल राख यांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनंतर छापा टाकला असता ४ टन जुने हँडग्लोजचा साठा पकडण्यात आला होता . 


छापा टाकल्यानंतर आरोपी प्रशांत सुर्वे याला अटक केली असता नवी मुंबईत आलेला हॅन्डग्लोजचा पुरवठा औरंगाबाद, भिवंडी येथून झाला असल्याची माहिती दिली होती. क्राईम ब्रान्च टीमने औरंगाबाद मध्ये जाऊन तपास केला असता तिथे १९ टन तर भिवंडी येथे १५ टन साठा सापडला. अधिक तपासा मध्ये जुन्या हँडग्लोजचा माल बंगळुरु, कोचिन , हैदराबाद येथून आल्याची माहिती मिळाली. 


 


जुन्या हँडग्लोजला धुवून परत विकणाऱ्या टोळीचे धागेदोरे दक्षिण भारतात मिळाले आहेत. बेंगलोर , हैदराबाद , कोचिन येथे छापा टाकत एकूण ४८ टन हँडग्लोजचा साठा जप्त करण्यात आला आहे. वॉशिंग मशीन, ड्रायर्स, ब्लोअर असा ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान नवी मुंबईतून हॅन्डग्लोज सप्लायर प्रशांत सुर्वे यांनी ज्या कंपणीला हँडग्लोज पुरवले होते. ते जप्त करण्याचे काम सुरू आहे.