नवी दिल्ली : देशभरात कोरोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार, प्रशासनाकडून वेळोवेळी अनेक सूचना देण्यात येत आहेत. कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी विविध उपाय-योजनाही केल्या जात आहेत. चंदीगढमध्ये एक स्मार्ट, डिजिटल उपाय योजण्यात येत आहे. चंदीगढमध्ये घरात आयसोलेटेड असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक उपाय योजण्यात आला आहे. त्यासाठी मोबाईल ऍपचा वापर केला जाणार आहे. ऍपद्वारे कोरोनासंबंधी निर्देशांचं पालन होतंय की नाही, यााबाबतही माहिती मिळणार आहे. या ऍपला सीव्हीडी ट्रॅकर (CVD-Tracker) असं नाव देण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍप, ट्रॅक केलेल्या व्यक्तीच्या हॉट स्पॉट्सची मर्यादा चिन्हांकित करेल. आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांना आपल्या मोबाईलवर हे ऍप डाऊनलोड करणं आवश्यक असणार आहे. सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आयसोलेशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक ऍप यूजरला आयसोलेशन भागाच्या 50 मीटरच्या अंतरातच राहवं लागेल. यूजरला प्रत्येक तासाला एक सेल्फी अपलोड करावा लागेल. त्यानंतर त्यांचा सेल्फी आणि आयसोलेशनची जागा मॅच केली जाईल.


सीव्हीडी ट्रॅकरचा वापर कसा होणार? -


मिळालेल्या रिपोर्ट्नुसार, आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलेला कोरोनाबाधित मर्यादित रेंजच्या बाहेर जाताच प्रशासनाला त्याबाबत एक अलर्ट पाठवण्यात येईल. त्यासोबत संसर्ग झालेल्या व्यक्तीलाही इशारा केला जाईल. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यावर FIR दाखल होऊन कठोर कारवाई करण्यात येईल. फोन बंद असल्यावरही त्याबाबत प्रशासनाला अलर्ट जाईल. आयसोलेशनमध्ये असणाऱ्या लोकांवर नजर ठेवण्यासाठी एक टीम आणि कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे.


आयटी डिपार्टमेन्टमधील उपविभागिय दंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणाऱ्या दिवसांत आयसोलेशनमधील लोकांच्या संख्येत वाढ होऊ शकते. हे ऍप GPS लोकेशनच्या मदतीने फायदेशीर ठरणार आहे. त्याशिवाय कोणत्याही प्रकारची चूक पोलीस प्रशासनाला त्वरित अलर्ट करु शकेल.