मुंबई : गोवा राज्य कोरोना विषाणू मुक्त झालं आहे. गोवा राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा रिपोर्ट दोन वेळेला आला निगेटिव्ह आल्यामुळे आता गोव्यात एकही कोरोनाबाधित नाही. यामुळे गोवा सरकारने गोव्याला कोरोना मुक्त जाहीर करावं अशी मागणी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोव्यात आढळलेले कोरोनाबाधित रूग्ण बरे झाले आहेत. आता एकही कोरोनाग्रस्त रूग्ण गोव्यात नाही. ३ एप्रिलनंतर गोव्यात एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आलेला नाही, अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विट करून दिली आहे. हे ट्विट मुख्यमंत्र्यांनी १५ एप्रिल रोजी केले आहे. 



देशात कोरोना संसर्गग्रस्तांची संख्या वाढत असून कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार ३७८ वर पोहचली आहे. आतापर्यंत देशात ४८० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात १९९२ लोक कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या ३२०५ इतकी झाली आहे. आतापर्यंत १९४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत. 




कोरोनामुक्त देश होण्यासाठी भारत सरकार प्रयत्न करत आहे. गोव्यात आता एकही कोरोनाबाधित रूग्ण राहिलेला नाही. २० एप्रिलनंतर राज्यातील काही गोष्टींवरील नियम शिथिल करण्यात येणार आहेत.