Corona IN India: देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढायला सुरूवात केली. दिल्लीसह हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. मास्क मुक्ती, शाळी सुरू करणं, कार्यक्रमांवरील बंधन हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याचदरम्यान  केरळमध्ये मास्कसक्ती लागू करण्यात आली. केरळमध्ये कोरोना रूग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने मास्क सक्ती लागू केलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सार्वजनिक ठिकाणी मास्क, सॅनिटायझरचा वापर अनिवार्य करण्यात आलाय. तसंच केरळमध्ये कारचालकांना तसंच सिनेमागृहातही मास्क अनिवार्य असेल. सध्या देशात एकूण 2035 कोरोना रूग्ण आहेत, त्यातले निम्मे म्हणजे 1300 कोरोना रूग्ण एकट्या केरळात आहेत.


कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी केरळ सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. सरकारने दिलेल्या सुचनेनुसार मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगची ही मार्गदर्शक तत्त्वे पुढील 30 दिवस राज्यात लागू राहतील. सर्व दुकाने, चित्रपटगृहे आणि विविध ठिकाणी सॅनिटायझरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही सरकारने दिल्या आहेत. सोमवारी देशात कोरोनाचे 114 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनाचे 2119 सक्रिय रुग्ण आहेत. देशातील कोरोनामधून बरे होण्याचा दर 98 टक्क्यांच्या पुढे गेला आहे, ही दिलासादायक बाब आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.


कोरोनाच्या XBB 1.5 प्रकाराने अमेरिकेसह युरोपातील अनेक देशांमध्ये कहर केला होता. भारतात या प्रकाराची 26 प्रकरणे समोर आली आहेत. त्याचवेळी राजधानी दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच, गेल्या 24 तासांत दिल्लीत कोरोनामुळे एकही मृत्यू झालेला नाही. सध्या दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या 10 आहे आणि या 9 पैकी 9 जणांवर त्यांच्या घरीच आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत. केरळ सरकारने 12 जानेवारी रोजी नव्याने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी सोशल डिस्टंसिंग पाळण्याचेही आदेश दिले आहेत. ही मास्कसक्ती 12 फेब्रुवारीपर्यंत लागू करण्यात आली आहे.