मुंबई : देशात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असताना गेल्या काही दिवसांपासून कोरोना रूग्णांच्या संख्येत घट दिसून येत आहे. शिवाय मृतांची संख्या देखील कमी होत आहे. गेल्या  24 तासांत 2 लाखांपेक्षा जास्त कोरोना नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर कोरोना या धोकादायक व्हायरसने 3 हजार 741 रूग्णांचा बळी घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील पॉजिटिविटी रेटच्या तुलन कोरोनाच्या विळख्यातून बाहेर येणाऱ्यांची वाढत आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 40 हजार 842 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. देशात उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या  28 लाख 5 हजार 399वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 2 लाख 99 हजार 266 रूग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. देशात आता पर्यंत 19,50,04,184  नारगरिकांना लस देण्यात आली आहे. 


महाराष्ट्रात शनिवारी 26 हजार 133 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली. तर 682 रूग्णांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.  आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार आतापर्यंत राज्यात 55,53,225 लोकांना कोरोनाची कोरोना व्हायरसची लागण झाली असून 87 हजार 300 रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.