अहमदाबाद : देशातील कोरोना वायरसच्या (COVID19) प्रकरणांमध्ये कमी आली असली तरी कोरोना पूर्णपणे बरा झालेला दिसत नाही. अद्यापही याची लस बाजारात नसल्याने हा धोका कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील याबद्दल वारंवार आवाहन करताना दिसतात. तरीही लोकं कोविड नियमांच पालन करताना दिसत नाहीत. अशावेळी राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर महत्वाची पाऊले उचलण्यास सुरुवात केलीय. 


अहमदाबादमध्ये कर्फ्यू 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता अहमदाबादमध्ये (Ahamadabad) कर्फ्यू लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. रात्री ९ वाजल्यापासून सकाळी ६ पर्यंत हा कर्फ्यू असणार आहे. शुक्रवारपासून हा कर्फ्यू अनिश्चित काळासाठी सुरु राहणार आहे. अहमदाबादमध्ये आतापर्यंत ४६ हजार ०२२ कोरोना केसची नोंद झालीय.



मुंबईमध्ये दुसऱ्या लाटेचा धोका 


देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा धोका निर्माण झालाय. नव्या वर्षात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते असा धोका मुंबई महापालिकेने वर्तवलाय. यासंदर्भात मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केलंय.


दिल्लीमध्ये लॉकडाऊनची तयारी 


दिवाळीनंतर राजधानी दिल्लीमधील कोरोना केसमध्ये वाढ झालीय. त्यामुळे दिल्ली सरकार पुन्हा लॉकडाऊन लावण्याच्या विचारात आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवून दिल्लीमध्ये अंशत: लॉकडाऊन लावण्याची परवानगी मागितली आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी दिल्ली सरकार लवकरच नव्या ६६० ICU खाटा उपलब्ध करून देणार आहे. तसंच रेल्वेदेखील ८०० बेड्स असलेले कोच दिल्लीसाठी देणार आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली असून कोरोनाची दुसरी लाट कशी हाताळायची, यावर या बैठकीत चर्चा होणं अपेक्षित आहे.