मुंबई : तबलिगी जमातीच्या लोकांमध्ये काहींना कोरोनाची लागण झाली आहे. यांना तुगलकाबादच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. तिथे या लोकांनी अतिशय गोंधळ घातला असून डॉक्टरांशी गैरव्यवहार केला आहे. डॉक्टरांवर शिवीगाळ करून त्यांच्यांवर थुंकण्यात आलं. ही माहिती उत्तर रेल्वेची सीपीआरओ दीपक कुमार यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यांनी दिलेल्या माहितीनुसार, निजामुद्दीन इलाके से तबलिगी जमातीच्या १६७ लोकांना मंगळवारी रात्री ९.४० वाजता क्वारंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आलं. तबलिगी मर्कझने आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. फक्त दिल्लीच नाही तर देशभरातील अनेक मुस्लीम या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या मर्कझमधून कोरोनाच्या विषाणूंचा अनेक राज्यांमध्ये फैलाव झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून डॉक्टरांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत असभ्य वर्तणूक केली जात आहेत.



पाच बसेसमधून आलेल्या १६७ लोकांना तुघलकाबाद क्वारंटाइन सेंटरमध्ये आणण्यात आलं आहे. 'सकाळपासूनच हे लोक असभ्य वर्तन करत आहेत. जेवणाच्या अवास्तव मागण्या करत आहेत. यावेळी त्यांनी क्वारंटाइनमधील कर्मचाऱ्यांसोबत चुकीचं वर्तन केलं. इतकंच नाही तर ते सगळीकडे थुंकत होते. त्यांच्यावर उपचार करणाऱ्यासाठी आलेल्या डॉक्टरांवर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या अंगावरही थुंकत होते,'अशी धक्कादायक माहिती दीपक कुमार यांनी दिली.


बुधवारी निजामुद्दीन मर्कझमधून २३०० लोकांना बाहेर काढण्यात आलं. दिल्ली पोलिसांनी या विरोधात अनेकांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या मौलाना साद यांचाही समावेस आहे.