मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाशी संवाद साधणार आहेत. सकाळी ९ वाजता एका व्हिडिओद्वारे हा संवाद साधला जाणार आहे. लॉकडाऊननंतर मोदी पहिल्यांदाच संवाद साधणार आहेत. देशाशी मोदी काय संवाद साधणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च हा दिवस 'जनता कर्फ्यू' म्हणून घोषित करण्यात आला. या दिवशी देश पूर्णपणे जनता कर्फ्यूत सहभागी झाला होता. यानंतर मोदींनी संपूर्ण देशभरात लॉकडाऊन केलं. १४ एप्रिलपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहून बाकी सर्व गोष्टी बंद करण्यात आल्या आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लॉकडाऊनच्या काळात पंतप्रधान मोदींनी नागरिकांना घरी राहण्याच आवाहन केलं होतं. ही परिस्थिती युद्धस्थिती आहे. पण हे युद्ध आपल्याला रणांगणावर उतरून नाही तर घरीच राघून जिंकायचं आवाहन मोदींनी केलं होतं.



देशात कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणि परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विविध राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत गुरूवारी आढावा बैठक घेतली. या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती होते. कोरोनाची वाढती लागण टाळण्यासाठी येत्या काळात परदेशवारी करुन आलेल्या सर्व व्यक्तींचा अधिक काटेकोरपणे शोध घेतला जावा इथपासून, आरोग्यसेवेसाठीच्या उपकरणांची उपलब्धता, तबलिगी जमातमधील सहभागी झालेल्यांचा शोध घेणं या मुद्द्यांवर या बैठतीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.