मुंबई : संपूर्ण जग कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोना व्हारसचा प्रसार दिवसेंदिवस वाढत आहे. १४ एप्रिलपर्यंत देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आलं आहे. वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जात आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या ही १९०० वर पोहोचलीय. कोरोनावर मात करण्यासाठी 'होम क्वारंटाइन' हा एकच उत्तम पर्याय आहे. असं असताना एक दिलासादायक घटना समोर आली आहे. एका तरूणाने अवघ्या १० दिवसांत कोरोनावर मात केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढ आहेत. असं असलं तरीही कोरोनाशी दोन हात करायचे आहेत. अशावेळी एक समाधानकारक आणि मनाला दिलासा देणारी घटना समोर आली आहे. या तरूणाने अवघ्या दहा दिवसांत कोरोनावर मात केली आहे. 


फुलवारी शरीफच्या बवनपुरामध्ये राहणारा राहुल स्कॉटलँडमधून आपल्या घरी परतला होता. राहुल मार्चमध्ये स्कॉटलँडहून भारतात परतला. २० मार्चला त्याला त्रास होऊ लागल्यामुळे रूग्णालयात दाखल केलं. २१ मार्च रोजी त्याच्या काही तपासण्या केल्या त्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. 



रूग्णालयात १० दिवस उपचार घेतल्यानंतर गेल्या चार-पाच दिवसांपासून त्याच्या प्रकृतीत सुधारणा आहे. त्यानंतर पुन्हा टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट निगेटिव्ह आले. २ दिवसांनी पुन्हा टेस्ट करण्यात आली ते रिपोर्टदेखील निगेटिव्ह आहे. आता राहुलला रूग्णालयातून सोडण्यात आलं आहे. मात्र पुढील १४ दिवस त्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं आहे.