कोलकाता : 31 मे रोजी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. लॉकडाऊन आणखी वाढणार असल्याच्या शक्यतांदरम्यान पश्चिम बंगालमध्ये 1 जूनपासून सर्व धार्मिक स्थळं खुली केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांशी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय पश्चिम बंगालमध्ये 8 जूनपासून सर्व सरकारी आणि खासगी ऑफिसेस खुली करण्यात येणार आहेत. 1 जूनपासून चहा आणि जूट कंपन्या 100 टक्के कर्मचाऱ्यांसह काम करण्यास सुरुवात करणार आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये अनेक नियम शिथिल केले जाणार असल्याची घोषणा केली आहे. 



दरम्यान, शुक्रवारी गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान मोदींशी लॉकडाऊनबाबत चर्चा केली. त्याआधी अमित शाह यांनी राज्यातील मुख्यमंत्र्यांशीही चर्चा केली होती. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 31 मेनंतर लॉकडाऊन 2 आठवड्यांपर्यंत वाढवला जाऊ शकतो.