नवी दिल्ली : कोरोना व्हायरस संसर्गाबाबत लोकांमध्ये एक वेगळीच बाब भारतात समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यूरोप आणि संपूर्ण जगाहून वेगळं, भारतात सर्वाधिक वृद्ध नाही तर मध्यम वयोगटातील आणि त्याहून कमी वयोगटातील लोकांना संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात शून्य ते 20 वर्षापर्यंतच्या वयोगटातील 9 टक्के संसर्गाची प्रकरणं समोर आली आहेत. त्याचप्रमाणे, 20 ते 40 वयोगटात 42 टक्के संसर्गग्रस्त लोक आढळले आहेत. तर 40 ते 60 वर्षीय वयोगटातील 33 टक्के संसर्ग झालेले रुग्ण आढळले आहेत. 7 वर्षांहून अधिक वयोगटातील 17 टक्के लोक आहेत.


तबलीगी जमातसंबंधी संसर्गाबाबत गृह मंत्रालयचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत तबलीकी जमातसंबंधी असलेल्या 22000 लोकांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. त्यापैकी 1023 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.


भारतात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आतापर्यंत 3000हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आतपर्यंत देशात 75 जणांचा मृत्यू झाला आहे.