Crime News In Marathi:  गावकऱ्यांनी तरुणीला तिच्या प्रियकरासोबत शेतात आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर संतापलेल्या गावकऱ्यांनी त्या दोघांनाही मारहाण केली. इतकंच नव्हे तर या घटनेचा व्हिडिओदेखील बनवला. या घटनेनंतर गावातील काही लोकांनी या प्रेमी युगुलांना तिथून पिटाळून लावले. मात्र, या घटनेचा परिणाम तरुणीवर इतका झाला की तिने घरी गेल्यानंतर टोकाचा निर्णय घेतला. या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी ही तरुणी घरी पोहोचल्यानंतर तिने गळफा घेत आत्महत्या केली. कुटुंबीयांना तीचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता. तेव्हा त्यांनी तात्काळ तिला खाली उतरवले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधत याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे तर याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. 


जिल्ह्यातील फतेहपूर चौरासी पोलिस स्थानकात कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तरुणीसोबत शेतात सापडलेल्या तरुणावर भारतीय दंड संहिता कलम 376 (बलात्कार) अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली आहे. तर, एकीकडे पोलिसांनी प्रेमीयुगुलांला मारहाण करण्याऱ्या सहा गावकऱ्यांविरोधातही आयपीसी कलम (आत्महत्येसाठी प्रवृत्त) 323 (जाणूनबुजून इजा पोहोचवणे) या अंतर्गंत अटक करण्यात आली आहे. 


उन्नाव पोलिसांतील एका ऑफिसरने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करताना आढळले की 20 वर्षांच्या तरुणीचे 25 वर्षांच्या रोहित निषादसोबत प्रेमसंबंध होते. सोमवारी संध्याकाळी दोघेही शेतात भेटले होते. त्याचवेळी पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या ओळखीचे काही गावकरी तिथे पोहोचले त्यांनी दोघांनाही आक्षेपार्ह अवस्थेत पकडले. त्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केली आणि त्यांना मारहाण केली. इतकंच नव्हे तर, व्हिडिओदेखील बनवला आहे. 


या व्हिडिओत दिसतंय की घटना घडली तेव्हा युवती एका गावकऱ्यांचा हात पकडून त्याला न मारण्याची विनंती करत आहे. ती त्याच्या पायाशी बसून त्याला न मारण्यास सांगत आहेत. मात्र तरीही तो तरुण तिला अमानुषपणे बुटांनी मारत आहे आणि तिला शिवीगाळदेखील करत आहे. तर रोहित तिचा प्रियकर यावेळी एका ठिकाणी उभा असलेला दिसत आहे. या प्रकरणी पोलिस अधिक कारवाई करत आहे.