Couple Kiss Near CM Residence Video: सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या नादात तरुणाई अगदी जीव धोक्यात टाकायलाही तयार असते, हे मागील काही काळापासून वेगवेगळ्या दुर्घटनांवरुन सिद्ध झालं आहे. कधी उंच इमारतींवर स्टंटबाजी तर कधी रिल्सच्या नादात वाहतुकीचे नियम मोडण्यासारख्या घटना आता वरचेवर पहायला मिळतात. असाच एक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. सामान्यपणे हे असले व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. मग लोक संताप व्यक्त करतात. पोलीस या स्टंटबाजांवर कारवाई करतात आणि सोडून देतात. मात्र यानंतरही असले स्टंट थांबताना दिसत नाहीत. एका जोडप्याच असाच स्टंट मोबाईल कॅमेरामध्ये कैद झाला असून आश्चर्याची बाब म्हणजे हा सारा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळच्या परिसरात घडला आहे.


व्हिडीओमध्ये काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सनरुफ गाड्यांची संख्या वाढल्यापासून धावत्या गाडीच्या छताचं सनरुफ उघडून गाडीच्या टपावरुन स्टंटबाजी करण्याचे प्रकार वाढले आहेत. अशाच एका स्टंटचा व्हिडीओ उत्तर प्रदेशणधून समोर आला असून या व्हिडीओमध्ये एक जोडपं नको ते चाळे करताना दिसत आहे. एक जोडपं धावत्या गाडीच्या सनरुफमधून बाहेर येऊन अश्लील कृत्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सदर घटना 1090 चौक आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या लखनऊमधील निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरील मार्गावरील आहे. या व्हिडीओमध्ये कारची नंबर प्लेटही स्पष्टपणे दिसून येत आहे.


अनेकांनी व्यक्त केला संताप


हा व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला असून हे जोडपं शहराची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप अनेकांनीकेला आहे. लखनऊ शहर हे नवाबांचं शहर म्हणून ओळखलं जातं. येथील परंपरा आणि संस्कृतीचा अपमान करणारं हे कृत्य असल्याचं अनेकांनी सोशल मीडियावरुन म्हटलं आहे. मागील वेळेस उत्तर प्रदेशमधून असा व्हिडीओ समोर आला असता त्यावेळेस उत्तर प्रदेश पोलिसांनी वाहनचालकाविरोधात कठोर कारवाई करुन मोठा दंड आकारला होता.



असाच अन्य एक व्हिडीओही झालाय व्हायरल


एकीकडे हा व्हिडीओ व्हायरल होत असतानाच, सोशल मीडियावर उत्तर प्रदेशमधीलच नोएडा शहरातील गौतम बुद्ध नगर परिसरामधील विद्यापीठामध्ये दोन विद्यार्थ्यी एकमेकांचं चुंबन घेताना रंगेहाथ पकडले गेले आहेत. या दोघांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हा व्हिडीओ कोणीतरी वर्गामधील खिडकीतून मोबाईलच्या माध्यमातून काढल्याचा दावा अनेक स्थानिक प्रसारमाध्यमांनी केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॉलेज प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली. नोएडा पोलीस या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहत असून या प्रकरणात तपास सुरु करण्यात आल्याचं 'जागरण' वृत्तपत्राने म्हटलं आहे.