प्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...
Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.
Pre Wedding Shoot At Railway Track : देशात लग्नाचा माहोल सुरु आहे. अनेक तरूण-तरूणी लग्नबंधनात अडकतायत. या लग्नबंधनात अडकण्यापुर्वी अनेक कपल्स प्री वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करत असतात. हे प्री-वेडिंगचं फॅड आता आताच सुरु झालं आहे. यामध्ये अनेक कपल्सचा हटके फोटोशूट करण्याकडे कल असतो. मात्र असचं हटके प्री वेडिंग शूट एका कपलला महागात पडलं असतं. कारण थोडक्यात या कपलंचा जीव वाचला. नेमकी घटनाक्रम काय आहे तो जाणून घेऊयात.
हटके प्री वेडिंग शुट
गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात. मात्र या घटनेत एका कपलने हद्दच केली होती. हटके प्री-वेडिंग शुट करण्यासाठी हे कपल थेट रेल्वे ट्रॅकवरचं (Railway Track)पोहोचलं होते.
रेल्वे ट्रकवर झोपले
हटके प्री-वेडिंग शुट (Pre Wedding Shoot) करण्यासाठी एक कपल थेट रेल्वे ट्रॅकवर (Railway Track) पोहोचले होते. या कपल सोबत त्यांचा फोटोग्राफर आणि काही मित्र होते. हे कपलं बिनधास्तपणे आपला जीव धोक्यात घालून रेल्वे ट्रॅकवर फोटो शुट करत होते. हद्द तर तेव्हा झाली, जेव्हा हे कपल थेट रेल्वे ट्रॅकवर झोपले. या दरम्यान जर वेगाने एक्सप्रेस ट्रेन आली असती तर मोठा अपघात होण्याची शक्यता होती.यासोबत दोघांच नवीन आयुष्य सुरु होण्यापुर्वीच संपलं असतं.
पोलिसांनी दिला दम
लग्नाळू कपलंच रेल्वे ट्रॅकवरील (Railway Track) हे फोटोशूट एका रस्त्यावरून दुचाकी घेऊन जाणाऱ्या वाहतूक पोलिसाने पाहिले होते.त्यामुळे त्याने दुचाकी रस्त्याच्या कडेला लावत कपलच्या दिशेने धाव घेतला. पोलिसाने स्वत:च्या स्मार्टफोनच्या कॅमेरा ऑन करत तो कपलच्या दिशेने गेला. त्याने कपलला दम देऊन ट्रॅकवर सुरु असलेला प्रकार थांबवला.
मिळालेल्या माहितीनूसार, तरुण आणि तरुणीचे लग्न होणार असून ते प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करत असल्याचे समजले. प्री-वेडिंग शूटसाठी कपलं ट्रॅकवर झोपले होते. या ट्रॅकवरून दर पाच मिनिटांनी एक ट्रेन जाते. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून तरुण-तरुणी प्री-वेडिंग वेडिंग शूट करत होते. त्यामुळे पोलिसांनी कपलला दम देऊन तेथून हटवले.
दरम्यान प्री-वेडिंग शूटचा (Pre Wedding Shoot) हा प्रकार पाहून वाहतूक पोलिसांनीही नाराजी व्यक्त केली. तसेच अशा प्रकारे फोटोशूट करून घेताना आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही वाहतूक पोलिसांनी सोशल मीडियावर तरुणांना केले आहे.