गर्लफ्रेंडला बुलेटच्या टाकीवर बसून बॉयफ्रेंडचा Romance; पुन्हा एका कपलचा Video Viral
Couple Romance Viral Video : बघता बघता काही क्षणात हा व्हिडीओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा कपलचा व्हिडीओ व्हायरल झाला.
Stunt Viral Video : सोशल मीडिया एक अशी विहीर आहे ज्यात उडी मारली तर पोहणं पण कठीण आणि बुडणं देखील सोपं नाही. या सोशल मीडियाने प्रत्येकाला वेड लावले आहे. पैसे खर्च न करता कुठलेही मेहनत न करता एका क्षणात तुम्ही जगभरात प्रसिद्ध होऊ शकता. या सोशल मीडियाचं जाळं दिवसेंदिवस तरुणाईला खोल दरीत घेऊन जाताना दिसत आहे.
प्रसिद्ध आणि पैशासाठी सोशल मीडियावर हल्ली रील्स बनवण्याचा ट्रेंड आला आहे. हे रील्स बनवताना ही पिढी जीवाचाही पर्वा करत नाही. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर बाइकवर स्टंट करण्यांचे अनेक व्हिडीओ सेकंद सेकंदाला व्हायरल होत असतात. (Couple Romance running bullet Trending Video of Stunt goes Viral Watch now )
बाइकवर रोमान्स !
धावत्या बाइकवर रोमान्स करणाऱ्या कपलचे अश्लील चाळे करतानाचे व्हिडीओ दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. अजून एका कपलचा हा खतरनाक आणि रोमान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या व्हिडीओमध्ये तरुणी धावत्या बुलेटच्या पेट्रोलच्या टाकीवर ती तरुणाकडे तोंड करुन बसली होती. धक्कादायक म्हणजे बाइकवरील हा रोमान्स करताना त्या दोघांनी हेल्मेट घातले नव्हते.
हा व्हिडीओ म्हणजे वाहतूक नियमाचं उंल्लघन आहे. अशा प्रकारे स्टंट करुन आपल्यासोबत इतऱ्यांचं जीव धोक्यात घालणे हे कितपत योग्य आहे? हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील ट्वीटरवर ममता त्रिपाठी यांनी शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्या म्हणाल्या आहेत की, ''नवाबांचं शहर लखनऊ...अलीगंजच्या शेजारी निराला नगर पुल.. जवानीची नशा आणि बुलेट.. हे कसलं प्रेम आहे ज्यासाठी लोक जीव धोक्यात घालायला तयार आहेत'',
या पोस्ट वरुन एक लक्षात आलं आहे हा व्हिडीओ उत्तर प्रदेश लखनऊमधील आहे.
यापूर्वी पण लखनऊमधीलच कपल दिवसाढवळ्या बाइकवर रोमान्स करताना दिसून आला होता. या अशा कपलमुळे पोलिसांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.