बुलंदशहर: सुनेच्या छळाला घाबरलेल्या एका वृद्ध जोडप्याने राष्ट्रपतींना पत्र लिहून थेट इच्छामरणाची मागणी केली आहे. पीडित जोडप्याचा मुलगा भारतीय लष्करात कॉन्स्टेबल पदावर नोकरी करतो. सून आपल्याला वेळेवर जेवण तर देतच नाही. पण, ती वेळोवेळी दमबाजी करते. शारीरिक आणि मानसिक त्रास देते. जेवत असताना ताटात भाकरी दूरून फेकते. काही बोलल्यास मरण्याची किंवा मारण्याची धमकी देते. सुनेच्या वागण्याबाबत मुलाला सांगितल्यास तोही इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगून दुर्लक्ष करतो, असा आरोप या जोडप्याने राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्रात केला आहे. 


पोटच्या पोरानेही फिरवली पाठ


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशातील बरकतपूर येथील नागरिक दानवीर त्यागी (वय ७० वर्षे) हे आपल्या पत्नीसह सुनेसोबत बीबीनगर परिसरात राहतात. राष्ट्रपतींकडे इच्छा मरणाची मागणी करणारे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. जोडप्याचे म्हणने असे की, त्यांनी त्यांचा मुलगा दीपला अत्यंत प्रेमाणे आणि लाडात वाढवले आहे. त्याला आयुष्यात काहीच कमी पडू दिले नाही. मोठा झाल्यावर तो लष्करात भरती झाला. त्यानंतर आम्ही त्याचे लग्न त्याच्या इच्छे प्रमाणे लावून दिले. सर्व काही चांगले चालले असताना दीपकची पत्नी आपल्याला त्रास देते. तिच्या त्रासाने आपण इतके व्यतीत झालो आहोत की, आता जीवनाचाही कंटाळा आला आहे, असे हे जोडपे सांगते.


शेजारी करतायत वृद्धांची सेवा


पीडित जोडप्याने पुढे असेही म्हटले आहे की, सुनेच्या त्रासाला कंटाळून जेव्हा मुलाकडे तक्रार केली. पण, त्याचा आमच्या सांगण्यावर विश्वास बसला नाही. मुलगा दीपकने आई-वडीलांना संपत्तीतून बेदखल केले आहे. शेजाऱ्यांना जेव्हा ते तहान आणि भुकेलेल्या आवस्थेत पाहतात तेव्हा, त्यांना त्यांची दया येते. गेले काही दिवस शेजारीच या पीडित दाम्पत्याची सेवा करतात. पण, या मुदद्यावरून सून शेजाऱ्यांशीही भांडण करते. जोडप्याचे म्हणने असे की, सुनेच्या छळाला वैतागून त्यांनी गावापंचायतीकडे तक्रारही केली. गावपंचातयतीने निर्णय दिला की, सुनेने सासू-सासऱ्याची सेवा करावी पण, सुनेने गावकऱ्यांना प्रत्युत्तर दिले की, आपण या दोघांना एक तुकडाही देणार नाही.