नवी दिल्ली : उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा यांनी सीतेला 'टेस्ट ट्युब बेबी' म्हटलं आणि अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्या... त्यामुळेच उत्तरप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांना कोर्टात खेचलं गेलंय. दिनेश शर्मा यांच्याविरोधात सीतामढीच्या एका न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. यामध्ये, शर्मा यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नादात असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. 


काय होतं वक्तव्य?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतिहासात रामायनाला महत्त्व आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्याबद्दल सर्वांनाच आदर आहे. मात्र, शर्मा यांनी सीतेबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून वाद ओढावून घेतला. सीतेचा जन्म टेस्ट ट्युबच्या माध्यमातून झाला. सीताजी टेस्ट ट्युबर बेबी असू शकते, असे विधान दिनेश शर्मा यांनी केलं होतं. हिंदी पत्रकारिता दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शर्मा यांनी सीता यांचा जन्म मातीच्या घड्यापासून झाला... त्यावेळी टेस्ट ट्युबच्या माध्यमातून मुलं जन्माला घालण्याची ही पद्धत होती, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. 


इतकंच नाही तर, महाभारतापासून पत्रकारिता सुरु आहे. नारद हा पहिला पत्रकार होता, असेही अक्कलेचे तारे त्यांनी तोडले. तसेच गुरुत्वाकर्षण, प्लास्टिक सर्जरी आणि अणूचा शोधही भारतात लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.