रांची : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.


लालूंसह १५ जण दोषी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चारा घोटाळा प्रकरणात सुनावणीदरम्यान रांची स्पेशल सीबीआय कोर्टाने लालू यांच्यासह १५ आरोपींना दोषी ठरवलं आहे. ३ जानेवारीला त्यांना शिक्षा सुनावली जाणार आहे.


माजी मुख्यमंत्री निर्दोष


माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे. लालूंना दोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना आता सरळ तुरुंगात पाठवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.


कोर्टाने ठरवलं दोषी


चारा घोटाळा प्रकरणात मोठ्या सुनावणीनंतर स्पेशल सीबीआय कोर्टाने आज आपला निकाल दिला. रांची सीबीआय कोर्टामध्ये लालू यादव हजर होते. ७ जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.


लालूंना धक्का


कोर्टाचा निर्णय त्यांच्याच बाजुने येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली होती. पण तसं तरी सध्या दिसत नाहीये. लालू यादव यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे आता ३ जानेवारीला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून आहे.