COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी दिल्ली : कोरोनाविरोधातल्या लढाईतील देशातली एक जबाबदार चॅनेल या नात्याने झी मीडियाच्या प्रतिनिधी  (Zee Media) पूजा यांनी ४ जानेवारी २०२१ ला दुपारी २ वाजता दिल्लीतल्या एम्स रूग्णालयात (AIMS Hospital) कोव्हॅक्सिन (Covaccine) ही लस टोचून घेतली. तुमच्या मनातला संभ्रम, लसीविषयीची भीती नष्ट व्हावी यासाठी हे प्रयोजन करण्यात आलं. तसंच गेल्या काही दिवसांपासून लसीबाबत सातत्याने गैरसमज पसरवणाऱ्या नेत्यांच्या डोळ्यातही अंजन घालण्यासाठी हे महत्वाच आहे.


कोरोना लस टोचून घेण्यासाठी  पूजा यांचं वजन आणि उंची मोजणी करण्यात आली. त्यानंतर ब्लड प्रेशर चेक तपासून झाल्यावर ब्लड टेस्ट करण्यात आली. रक्तात अँटीबॉडीज आहेत की नाही ? हे तपासण्यात आलं. 



याच वेळी कोरोना टेस्टही करण्यात आली. अखेर पूजा यांना लसीकरण करण्यात आलं. लसीकरणानंतर पूजा यांना एक फॉर्म देण्यात आला. या फॉर्ममध्ये त्यांना रोज माहिती लिहावी लागली. यात रिपोर्टनुसार नोंदणी होते. हे फक्त ट्रायलच्या दरम्यानच करण्यात आलं. यामुळे लसीचे पॉझिटिव्ह रूग्ण, आणि निगेटीव्ह रूग्णावर काय परिणाम होतील ही माहिती डॉक्टरांना समजते.